Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

नागरी बँक

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ. आनंद जोगदंड 020-26128979
पदनाम (प्र)अपर आयुक्त व‍ विशेष निबंधक  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव डॉ.सोपान शिंदे 020-26122846/7 Ext no.- 242,244
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था  

कार्यासनाचे कामकाज

राज्यस्तरीय बँकांसंबंधीचे सर्व वैधानिक कामकाज

कलम

कामकाज

9

सहकारी संस्थांची नोंदणी करणे.

13

सहकारी संस्थांची पोटनियम दुरुस्ती करणे .

14

सह. संस्थांची पोटनियम दुरुस्ती करणेस आदेशित करणे.

23

सभासदत्व नाकारलेच्या अपीलावर निर्णय देणे.

35

सभासदत्व कमी केल्याच्या अपीलावर निर्णय देणे.

36

बँकांच्या मालमत्ता खरेदी विक्री प्रस्तावावर निर्णय देणे.

44

बिगर सभासदांना कर्जपुरवठा करण्यास ना-हरकत देणे.

70 ड

राखीव निधी / इमारत निधी वापरास परवानगी देणे.

73 सी ए

संचालकांनी अपात्रता धारण केल्यास त्यास अपात्र घोषित करणे.

77 अ

समितीने पदग्रहण करण्यास कसूर केल्यास प्रशासक नियुक्ती करणे.

78

समितीस / समिती सदस्यास  अपात्रता धारण केल्यास काढून टाकणे.

79 अ

अनिवार्य विवरणपत्रे दाखल केल्याची खातरजमा करणे.

82

लेखापरिक्षणामध्ये दर्शविलेल्या त्रुटींची दोषदुरूस्ती करून घेणे.

83

सहकारी संस्थांची नुकसानी निश्चित करण्यासाठी चौकशी करणे.

88

नुकसानीची जबाबदारी निश्चित करणे, अपचाऱ्यांकडून वसूल करणे.

89 अ

सहकारी संस्थांची तपासणी करणे.

102 ते 110

सहकारी संस्थांचे अवसायन करणेसाठी अवसायक नेमणे (समापन), अवसायकाच्या कामकाजाचा आढावा घेणे  व नियंत्रण ठेवणे, अवसायन कामकाजास मुदतवाढ देणे,  वाढावा surplus fund कडे वर्ग करणे.

110 ए

RBI च्या requisition नुसार बँकेचे संचालक मंडळ निष्प्रभावित करून प्रशासक  नियुक्त  करणे / अवसायकाची  नियुक्ती  करणे.

152 अ

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाविरुद्धचे अपील चालविणे.

156

विशेष वसूली अधिकारी नेमणे, त्यांच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे.

धोरणात्मक बाबी

 

बहुराज्यीय सहकारी बँकांच्या बँकांचे कामकाज करणे.

  1. बहुराज्यीय नागरी सहकारी बँकांच्या वसुली अधिका-यांना बँक बहुराज्यीय होण्यापूर्वी प्राप्त वसुली दाखल्यांसाठी तसेच बँकेत विलीन झालेल्या राज्यातील नागरी सहकारी बँकांचे वसुलीचे अधिकार प्रदान करणे.
  2. बहुराज्यीय नागरी सहकारी बँकांवर लवाद ( Arbitrator) नियुक्ती करणे.
  3. सहकारी बँकांना बहुराज्यीय नागरी सहकारी बँकांमध्ये रुपांतरासाठी ना हरकत देणे.

 

रिझर्व्ह बँकेशी संबंधी कामकाज

  1. मुंबई व नागपूर येथे होणा-या TAFCUB च्या बैठकीबाबत कृती अहवाल तयार करणे.
  2. TAFCUB मध्ये दिलेल्या सूचनांनुसार संबंधीत क्षेत्रीय अधिकारी / बँकांना निर्देश  देणे.
  3. रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त तक्रार अर्जांवर कार्यवाही करणे.
  4. मुंबई / नागपूर येथील TAFCUB च्या बैठकांना उपस्थित राहणे.

 

अवसायन  /   D.I.C.G.C. शी संबंधीत कामकाज

  1. DICGC ने दिलेल्या सूचनांनुसार संबंधीत अवसायक / क्षेत्रीय अधिका-यांना निर्देश देणे.
  2. अवसायकांनी ठेवीदारांचा क्लेम न पाठविल्यास त्याबाबत पाठपुराव करणे.
  3. अवसायकाने DICGC / रिझर्व्ह बँकेकडे पाठवावयाच्या त्रैमासिक अहवाल पाठविण्याबाबत अवसायकाकडे पाठपुरावा करणे.

 

शासनाशी संबंधीत कामकाज

  1. एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा प्रस्ताव शासनास मंजूरीसाठी पाठविणे.
  2. विधानसभा तारांकित /अतारांकित प्रश्न, आश्वासन, कपात सूचना, लक्षवेधी सूचना, अर्धा तास सूचना  याबाबत उत्तरे व पूरक‍ टिपणी पाठविणे.
  3. शासनाकडून प्राप्त तक्रारींबाबत क्षेत्रीय अधिका-यांकडून अहवाल मागवून शासनास  पाठविणे.
  4. शासनाच्या विविध बैठकांसाठी  टिपणी तयार करणे / आवश्यकता असल्यास सभेस उपस्थित राहणे.
  5. अधिवेशन काळात briefing करण्यासाठी नागपूर व मुंबई येथे विधानभवनात जाणे.

 

इतर बाबी

  1. राज्यातील बँकांसाठी  धोरणात्मक निर्णयाबाबतची परिपत्रके तयार करुन निर्गमित करणे.
  2. विविध प्रकारच्या बैठका, परिषद इ. करिता टिपणी तयार करणे.
  3. धर्मादाय देणगी प्रस्तावावर निर्णय घेणे.
  4. निर्लेखन (Write off) च्या प्रस्तावावर निर्णय घेणे.
  5. कायदेशीर बाबींबाबत, अभिप्राय / मार्गदर्शन करणे.

 

प्राप्त तक्रार अर्जांवर कार्यवाही करणे.

  1. प्राप्त तक्रार अर्जावर आवश्यकता असल्यास कलम 81(3)(ब) अन्वये फिरते पथकामार्फत चौकशी करणेबाबत कार्यवाही करणे.
  2. तक्रार अर्जांबाबत प्राप्त चौकशी अहवालाबाबत आवश्यकतेनुसार कायदेशीर कार्यवाही करणे.
  3. तक्रार अर्जावर योग्य ती कार्यवाही करणेाबाबत क्षेत्रीय अधिकारी / बँकांना सूचना देणे.

 

कोर्टाशी संबंधीत कामकाज

  1. मा.मंत्री महोदयांकडे दाखल पुनरिक्षण अर्जावर म्हणणे दाखल करणे.
  2. कोर्टाकडे दाखल याचिकांबाबत क्षेत्रीय अधिका-यांना प्राधिकृत करणे. परिच्छेदनिहाय अभिप्राय / शपथपत्र तयार करुन देणे.
  3. आवश्यकतेप्रमाणे  न्यायालयात उपस्थित राहणे.
  4. कोर्टाचे निर्णयाप्रमाणे कार्यवाही करणेबाबत क्षेत्रीय अधिका-यांना कळविणे.

 

उणे नक्त मूल्य असणा-या नागरी सहकारी बँकांचा आढावा घेणे.

  1. उणे नेटवर्थ नागरी सहकारी बँकांची माहिती आर.बी.आय. कडून घेणे.
  2. उणे नेटवर्थ मधील बँकेवर पालक अधिकारी नियुक्ती बाबत क्षेत्रीय अधिका-यांना सूचना देणे.
  3. उणे  नेटवर्थ असणा-या बँकांच्या पालक अधिकारी / बँक यांचा त्रैमासिक आढावा घेणे.