अ) सहकारी संस्थाबाबतच्या तक्रारी
- सहकार आयुक्त कार्यालयातील प्राप्त झालेल्या सर्व सहकारी संस्थांच्या तक्रारी (गृहनिर्माण सह.संस्थांच्या तक्रारी वगळून) या कार्यासनाकडे नोंदविल्या जातील व नंतर संबंधीत शाखेकडे पाठविल्या जातील.
- सर्व तक्रारींचा एकत्रित DATABASE तयार करणे.
- मुख्यालय पातळीवर प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेणे,चौकशी पुर्ण करुन घेण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणे.
- संबंधीत कार्यासनाकडे पाठविलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विभाग,जिल्हा,तालुका पातळीवर समन्वय साधणे.
- ज्या विभागात किंवा विशेषत: ज्या संस्थांच्या विरुध्द तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याप्रकरणी अशा संस्थांची विशेष सभा संबंधीत निबंधक व तक्रारदार यांचे उपस्थितीत बोलावणे व तक्रारींचे निवारण करणे बाबत मुख्यालयाच्या संबंधित कार्यासनाशी संपर्क साधणे.
- महाराष्ट्र शासनाने आपले सरकार या पोर्टलवर प्राप्त होणा-या तक्रारी, मा.मुख्यमंत्री,म.राज्य यांचेकडून प्राप्त होणा-या तक्रारी,तसेच सहकार आयुक्त कार्यालयाच्या संगणकीय प्रणालीमध्ये प्राप्त होणा-या तक्रारींचा प्राधान्याने व विहित मुदतीत निपटारा करणे. तसेच त्या बाबत संबंधित कार्यासनाशी समन्वय ठेवणे.
- प्राप्त तक्रारी अर्ज मुदतीत निकाली काढण्यासाठी कार्यवाही करणे
- ऑन लाईन तक्रार अर्जाबाबतची माहिती संकलित करणे.
a. मुख्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारी ३ महिन्यात निकाली काढणे.
b. विभाग कार्यालयास प्रापत झालेल्या तक्रारी 2 महिन्यात निकाली काढणे.
c. जिल्हा व तालुका कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारी 1 महिन्यात निकाली काढणे.
ब) शासकिय अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुध्द तक्रारी
- अधिकारी/कर्मचारी तक्रार अर्जावर चौकशी करणे.
- चौकशी अहवाल शासनास सादर करणे.
- सेवानियमानुसार कायदेशिर कार्यवाही करणे बाबत आस्थापना शाखेस कळविणे.
- दोषी अधिकारी/ कर्मचारी विरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या अनुषंगाने कामकाम करणे.
- माहिती अधिकाराअंतर्गत तक्रारदारांना माहिती देणे.
- माहिती अधिकाराअंतर्गत अपिलीय कामकाज चालविणे.
- तक्रार निवारण सहकारी संस्था व दक्षता कार्यासनाचे सर्वसाधारण धोरणात्मक कामकाज.
- कार्यासनाचे आठवडा कार्यविवरण (Abstract) बाबतचे कामकाज.
- मा.मंत्री,मा.खासदार,मा.आमदार व अन्य लोकप्रतिनिधी आणि लोकआयुक्त यांचे तक्रारी बाबतचे कामकाज
- तक्रारी निवारण सहकारी संस्था व दक्षता कार्यासना मधील आवश्यकतेनुसार न्यायालयीन कामकाज.
- विधानसभा/विधानपरिषद/तारांकित/अतारांकित कामकाज