Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

गृहनिर्माण

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ. एन. पी. यगलेवाड 020-26127261
पदनाम अपर निबंधक (सर्वसाधारण)  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. दिलीप उढाण  020-26122846/7 Ext no.- 240, 241
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था  

कार्यासनाचे कामकाज

राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थासबंधीचे कामकाज

  1. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे आदर्श उपविधीमध्ये कालानुरुप दुरुस्ती करणे.
  2. मानिव अभिहस्तांतरण कामकाजावर नियंत्रण ठेवणे व राज्यातील माहिती संकलित करणे. (कन्व्हेयन्स डिड)
  3. जिल्हा निहाय दर तीन महिन्यातून एकदा हाऊसिंग दरबार आयोजित करणेबाबतचे कामकाज.
  4. मुख्यालयास प्राप्त झालेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करणेसाठी संबंधित निबंधकांना सुचना देवून सदर तक्रारींचे निराकरण करणे बाबत पाठपुरावा करणे.
  5. सिडको, एस. आर. ए.,म्हाडा, एम.एम.आर.डी.ए. मुंबई या कार्यालयाशी अनुषंगिक पत्र व्यवहार करणे.
  6. राज्य हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन, मुंबई, विदर्भ प्रिमीयर हाऊसिंग सोसायटी, नागपूर, हाऊसिंग फेडरेशन या व अशा प्रकारच्या राज्यस्तरीय संस्थांचे कामकाज.
  • राज्यस्तरीय सहकारी  संस्थांची नोदणी करणे.
  • राज्यस्तरीय सहकारी संस्थांचे पोटनियम दुरुस्ती करणे.
  • राज्यस्तरीय सहकारी संस्थांचे पोटनियम दुरुस्ती करणेस आदेशीत करणे.
  • सभासदत्व नाकारलेल्या अपिलावर निर्णय देणे.
  • सभासदत्व कमी केल्याच्या अपिलावर निर्णय देणे.
  • राज्सस्तरीय संस्थांच्या मालमत्ता विक्री प्रकरणी वाजवी किंमत निश्चित करणे.
  • मालमत्ता खरेदी / विक्री प्रस्तावावर निर्णय देणे.
  • संचालकांनी अपात्रता धारण केली असल्यास त्यास अपात्र घोषित करण्याची कार्यवाही करणे.
  • समितीने पदग्रहण करण्यास कसूर केल्यास प्रशासक / प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करणे.
  • समितीस / समिती सदस्यास अपात्रता धारण केल्यास काढून टाकणे.
  • अनिवार्य विवरणपत्रे दाखल केल्याची खातरजमा करणे.
  • लेखापरिक्षणामध्ये दर्शविलेल्या त्रुटींची दोष दुरुस्ती करुण घेणे.
  • सहकारी संस्थांचे नुकसान निश्चित करणेसाठी चौकशी करणे.
  • सह संस्थेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करणे व सदरची रक्कम अपचाऱ्याकडून वसुल करणे.
  • सहकारी संस्थेची तपासणी करणे.
  • सहकारी संस्थेचे अवसायन करणेसाठी अवसायकाची नियुक्ती करणे.

7. जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे.

8. कलम 83 व 88 ची माहिती संकलित करणे.

9. सिडको अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कलम 21 अ नूसार विनोंदणी (Deregistration) करणे.

10. हाऊसिंग मॅन्युअल अद्यावत करणे.