Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

सर्वसाधारण

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ. नागनाथ पी. यगलेवाड 020-26127261
पदनाम अपर निबंधक (सर्वसाधारण)  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्रीमती शैलजा सारडा 020-26122846/7 Ext no.- 245
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था  

कार्यासनाचे कामकाज

. सर्वसाधारण सह. संस्था, सुशिक्षीत स्वयंरोजगार संस्था, राज्यस्तरीय संस्थांच्या नोंदणी व इतर वैधानिक बाबींसंबंधी कामकाज

  • राज्यस्तरीय सहकारी  संस्थांची नोंदणी करणे.
  • राज्यस्तरीय सहकारी संस्थांचे पोटनियम दुरुस्ती करणे.
  • राज्यस्तरीय सहकारी संस्थांचे पोटनियम दुरुस्ती करणेस आदेशीत करणे.
  • सभासदत्व नाकारलेल्या अपिलावर निर्णय देणे.
  • सभासदत्व कमी केल्याच्या अपिलावर निर्णय देणे.
  • राज्सस्तरीय संस्थांच्या मालमत्ता विक्री प्रकरणी वाजवी किंमत निश्चित करणे.
  • मालमत्ता खरेदी / विक्री प्रस्तावावर निर्णय देणे.
  • संचालकांनी अपात्रता धारण केली असल्यास त्यास अपात्र घोषित करण्याची कार्यवाही करणे.
  • समितीने पदग्रहण करण्यास कसूर केल्यास प्रशासक / प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करणे.
  • समितीस / समिती सदस्यास अपात्रता धारण केल्यास काढून टाकणे.
  • अनिवार्य विवरणपत्रे दाखल केल्याची खातरजमा करणे.
  • लेखापरिक्षणामध्ये दर्शविलेल्या त्रुटींची दोष दुरुस्ती करुण घेणे.
  • सहकारी संस्थांचे नुकसान निश्चित करणेसाठी चौकशी करणे.
  • सहकारी संस्थेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करणे व सदरची रक्कम अपचाऱ्याकडून वसुल करणे.
  • सहकारी संस्थेची तपासणी करणे.
  • सहकारी संस्थेचे अवसायन करणेसाठी अवसायकाची नियुक्ती करणे.

 

मुख्यालयातील कामकाजाचे व्यवस्थापन

  1. आवक-जावक नोंद घेणे. कार्यासनांना टपाल हस्तांतर करणे व नोंद करणे.
  2. मंत्रालय / मुख्यालय स्तरीय  बैठकांची पूर्वतयारी, माहिती संकलन, व्यवस्थापन करणे.
  3. विभागीय कार्यालय प्रमुख व जिल्हा कार्यालय प्रमुख यांची मासिक आढावा सभा आयोजित करणे व अनुषांगिक कामकाज.
  4. ZPDD अन्वये सर्व कार्यासनांचे साप्ताहिक कार्यविवरण (गोषवारा) अहवाल तयार करणे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे अहवाल संकलित करणे.
  5. KRA (Key Result Areas) अहवाल संकलन करून शासनास सादर करणे.
  6. मुख्यालयाचे PR-A व PR-B नियतकालिके संबंधित अहवाल संकलन करणे. 
  7. महिला तक्रार निवारण समिती संबंधित बैठकांचे अनुषांगिक कामकाज.
  8. शासकीय लेखन सामुगी मागणीपत्रे पाठविणे, प्राप्त करुन घेणे व  कार्यासनांना वाटप करणे.
  9. कार्यालयीन इतर स्टेशनरीच्या खरेदी-विक्री संबंधीचे कामकाज, अनुषांगिक देयकांवर कार्यवाही करणे.
  10. महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन संबंधी सर्व सनियंत्रण करणे.
  11. कार्यालयातील सर्व दुरध्वनींची देयके प्रमाणित करुन लेखा शाखेस पाठविणे.  तसेच अंतर्गत दूरध्वनी, पी.बी.एक्स देखमाल व कामकाज करणे.
  12. जडवस्तू संग्रह खरेदी, देखभाल करणे. विजेच्या उपकरणांची देखमाल व  दुरुस्ती करणे.
  13. वाहनासंबंधीत सर्व अनुषांगिक कामकाज (सर्व्हिसिंग, खरेदी, इंधन देयक) करणे.
  14. मा.जिल्हाधिकारी / पोलीस विभागाकडून मागणी करण्यात येणा-या वाहनांचे  व अधिकारी / कर्मचाऱ्यांचे संबंधी कार्यवाही करणे.
  15. सहकार आयुक्त कार्यालयातील अभिलेख कक्षाचे व्यवस्थापन करणे.
  16. मा.सहकार आयुक्तांच्या संबधीचे व पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्या संबंधी कामकाज

 

 

क्षेत्रीय कार्यालयांचे सनियंत्रण विषयक कामकाज

  1. सहकारी संस्थांचे सर्वेक्षण माहितीचे संकलन करणे.
  2. वार्षिक सहकार पुरस्कार कार्यक्रम सर्व अनुषांगिक कामकाज करणे.
  3. सहकार शताब्दी निधी संबंधी बँक खात्याचे सर्व कामकाज करणे.
  4.  (अ) राज्यस्तरीय सर्वसाधारण प्रकारच्या सहकारी संस्थांविषयक सनियंत्रण कक्षाचे कामकाज, (ब) आदिवासी सहकारी संस्थांचे कामकाज व आदिवासी विकास महामंडळ, नाशिकचे कामकाज, आणि (क) बेरोजगार, स्वंयरोजगार व नाविन्यपूर्ण सहकारी संस्थांचे सर्व कामकाज करणे.
  5. जिल्हा व विभाग स्तरावरील अवसायन निधी बाबतचे माहितीचे संकलन करणे. अवसायन निधी संबंधी बँक खात्याचे सर्व कामकाज करणे.
  6. शासकीय सेवेतील अंध/अपंग कर्मचाऱ्यांना उपकरणे उपलब्ध करून देणे बाबत सर्व अनुषांगिक कामकाज करणे.
  7. क्षेत्रीय कार्यालयांचे  कार्यालयीन भाडे/ कार्यालय स्थंलातर/ नवीन कार्यालय मंजुरीबाबत  कामकाज.
  8. सर्व प्रकारच्या सहकारी संस्था तपासणी व कनिष्ठ कार्यालय तपासणी
  9. महालेखाकार यांचे संबंधिचे कामकाज
  10. वि.स.नि./जिल्हा कार्यालयाकडून जडवस्तू व फर्निचर खरेदी करणे संदर्भात    आलेल्या पत्रानुसार शासनास पत्रव्यवहार करणे
  11. सहकार संकुल सर्व कामकाज
  12. सहकार न्यायालयासंबधीचे सर्व कामकाज
  13.  कार्यालयीन / संस्था तपासणीबाबत काम करणे.
  14. वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा कामकाज करणे.