भरती
- गट अ आणि गट ब संवर्ग अधिकारी यांची बिंदु नामावली निश्चित करणे, रिक्त पदे विचारात घेऊन सरळसेवा मागणीपत्र तयार करणे व पदोन्नती कार्यवाही करणे.
- मुख्यालयातील अराजपत्रित कर्मचारी वर्ग-3 व 4 यांची बिंदु नामावलीनुसार नेमणूका/बदल्या/पदोन्नती
- स्वातंत्र्यसैनिक ,माजी सैनिक,प्रकल्पग्रस्त ,अनुकंपा नेमणूका संबंधीचे कामकाज
2. गट अ व ब संवर्गातील परीविक्षाधिन अधिकारी यांचे प्रशिक्षण-
अ) सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गट अ व ब संवर्गातील परीविक्षाधिन अधिकारी यांचे प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे व CPTP (Common Probitanory Training Programme) अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
3. सेवाविषयक बाबी –
- प्रशासन / लेखापरिक्षण विभागातील वर्ग-1 व वर्ग-2 अधिका-यांच्या प्रारुप सेवाजेष्ठता याद्या प्रसिध्द करणे
- राज्यस्तरीय सहकारी अधिकारी श्रेणी-1/कार्यालय अधिक्षक, वरिष्ठ/कनिष्ठ लघुलेखक व लघुटंकलेखक यांच्या अंतिम सेवाजेष्ठता याद्या प्रसिध्द करणे.
- मुख्यालयातील वर्ग-3 व 4 कर्मचा-यांच्या अंतिम सेवाजेष्ठता याद्या प्रसिध्द करणे
- राजपत्रित / अराजपत्रित पदांचे सेवाप्रवेश नियम तयार करणे. (प्रशासन / लेप)
- सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वरील कार्यवाही.
- अधिकारी / कर्मचारी जात पडताळणीबाबत (प्रशासन / लेखापरिक्षण) कार्यवाही
- सर्व राजपत्रित अधिकारी गट अ आणि गट ब यांच्या गोपनीय अहवालाचे संस्करण. व त्यानुषंगाने कार्यवाही.
- भारतीय प्रशासन सेवेतील नियुक्तीसाठी खात्यातील अधिकाऱ्यांचे प्रस्ताव शासनास सादर करणे
- राजपत्रित गट अ आणि गट ब यांचे 49/54 चे पुनर्विलोकनाबाबतचे प्रस्ताव तयार करुन शासनास सादर करणे. (प्रशासन/लेप)
- 49/54 चे पुनर्विलोकन करणे. (मुख्यालयातील वर्ग-3 व 4 चे कर्मचारी)
- राजपत्रित / अराजपत्रित कर्मचारी यांच्या मानीव दिनांक प्रकरणांबाबत कार्यवाही
- सहकार खात्याच्या आकृतीबंधासंबंधीचे कामकाज.
- राजपत्रित अधिकारी वर्ग-1 व 2 यांच्या व मुख्यालयातील कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबीवर अनुषंगीक कारवाई करणे.
- राजपत्रित अधिकारी वर्ग-1 व 2 चे जन्मतारखांचे पडताळणीबाबतचे प्रस्ताव.
- महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदली कायदा सन 2006 विषयक सर्व प्रकारचे कामकाज.
- परसेवा/प्रतिनियुक्ती (राजपत्रित/अराजपत्रित)(प्रशासन/लेखापरिक्षण) संबंधीचे कामकाज
- मत्ता व दायित्वाची विवरणपत्रे सकंलीत करणे व संस्करण करणे.
- अपंग वाहन भत्ता मंजूर, रोख रक्कम हाताळलेबाबत रोख भत्ता मंजूर करणे
- अंध/अपंग व तत्सम आरक्षण /अनुशेष भरुन काढणेबाबतची माहिती संकलित करणे व एकत्रित अहवाल तयार करणे.(मुख्यालय/विभाग)
4. शिक्षा –
- राजपत्रित अधिकारी व मुख्यालयातील कर्मचारी यांच्याविरुध्दच्या विभागीय चौकशी विषयक व शिस्तभंगविषयक सर्व कामकाज (प्रशासन/लेखापरिक्षण)
- सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्दची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केलेल्या कारवाई संबंधी प्रकरणांचा आढावा घेऊन पुढील अनुषंगीक कारवाई करणे.
- लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केलेल्या/फौजदारी खटल्यामध्ये गुंतलेल्या निलंबित शासकीय अधिकारी/ कर्मचा-याचे पुर्नस्थापनेचा आढावा घेवून,शासनास प्रस्ताव सादर करणे.
5. सेवानिवृत्ती विषयक बाबी –
- मुख्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची, प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व विभागीय सहनिबंधक यांचे सेवानिवृत्तीची प्रकरणे/कुटूंब निवृत्तीवेतन प्रकरणासंबंधीचे कामकाज.
- राजपत्रित अधिकारी व मुख्यालयातील अराजपत्रित कर्मचारी यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्ती प्रकरणी अनुषंगीक कारवाई करणे.
6. न्यायालयीन बाबी-
1. न्यायालयीन प्रकरणे (मॅट व हायकोर्ट) (प्रशासन/लेखापरिक्षण)
2. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 अंतर्गत अपीले, पुन:रिक्षण, पुनर्विलोकन याबाबतचे कामकाज.