सावकारी विषयक कामकाज:-
- महाराष्ट्र सावकारी (नियम) अधिनियम 2014 चे कलम 9 अन्वये पुनर्निरीक्षण (REVISION) अर्जावर सुनावणीसाठी मा. अपर आयुक्ताकडे प्रकरण सादर करणे . सुनावणी नोटीस निर्गमीत करणे.
- सावकारी कामकाजा बाबत शासनास धोरणात्मक प्रस्ताव पाठविणे.
- विदर्भ मराठवाडयातील शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेल्या कर्जास माफी देणे बाबतच्या योजनेचे सनियंत्रण करणे.
- राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जाचा निपटारा करणे. शासनास माहिती सादर करणे. शासनाने अहवाल मागविले असल्यास अहवाल सादर करणे.
- सावकारी विषयक विधान सभा प्रश्नांना उत्तर देणे व शासनास माहिती सादर करणे.
- न्यायालयीन प्रकरणात सहकार आयुक्त कार्यालयाची बाजू मांडण्याकरिता सर्व संबंधीत अधिकारी यांना प्राधिकृत करणे. , परिच्छेदनिहाय अभिप्राय तयार करणे किंवा सादर झालेले परिच्छेद निहाय अभिप्राय मंजूर करणे.
· सहकारी संस्था विषयक कामकाज :-
- वैधानिक कामकाज:
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम1960 व त्या खालील नियम 1961 मधील तरतूदीनूसार निबंधक म्हणून म.रा. सह. कृषी ग्रामीण बहुद्देशिय बँक मर्या. मुंबई (शिखर बँक मुंबई) या संस्थेचे कामकाज पहाणे.
- महाराष्ट्र राज्य कृषि व ग्रामीण बँकेच्या व आवश्यकता भासल्यास जिल्हा भूविकास बँकेच्या अधिका-यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 107 मधील सहकारी कर्ज वसुलीचे अधिकार प्रदान करणे.
- धोरणात्मक बाबींवर पत्रव्यवहार:-
- महाराष्ट्र राज्य सहकारी कृषि बँकेच्या सर्व धोरणात्मक कामकाज व सर्वसाधारण पत्रव्यवहार पहाणे.
- जिल्हा भूविकास बँका बाबत धोरणात्मक कामकाज व सर्वसाधारण पत्रव्यवहार पहाणे.
- शासन निर्णय दि. 24.7.2015 ची अंमलबजावणी करणे.
- शिखर बँकेचे लेखापरीक्षण करवून घेणे,दोष दुरुस्ती करवून घेणे,दोष दुरुस्ती अहवालाची छाननी करणे.
- शिखर बँक व जिल्हा भूविकास बँकांची माहिती संकलन करणे व आवश्यकता असल्यास शासनास पाठविणे.
- शिखर व जिल्हा भूविकास बँकांच्या मालमत्ता बाबत शासन निर्णयातील तरतूदी प्रमाणे व कायद्यातील तरतूदी प्रमाणे निर्णय घेणे.
- शिखर बँकेच्या कामकाजा बाबत आवश्यक असल्यास क. ८३ व ८८ अनुसार चौकशी आदेश निर्गमित करणे. चौकशी कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेणे. चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर चौकशी अहवालावर पुढील कार्यवाही करणे.
- शिखर बँक व जिल्हा भूविकास बँका बाबत शासनाकडे पत्रव्यवहार करणे.
- भूविकास बँका बाबत अवसायन व अनुषंगीक कामकाज सनियंत्रण करणे.
- शिखर व जिल्हा भूविकास बँका बाबत विधी मंडळात उपस्थित करण्यात आलेले प्रश्न चर्चा, कामकाज इ. बाबत शासनास पत्रव्यवहार करणे.
- विविध न्यायालयीन प्रकरणात संबंधीत अधिकारी यांना प्राधिकृत करणे , परिच्छेदनिहाय अभिप्राय तयार करणे किंवा सादर झालेले अभिप्राय मंजूर करणे.
· उपसा जलसिंचन सहकारी संस्था विषयक कामकाज :-
- उपसा जलसिंचन सहकारी संस्थांचा पत्रव्यवहार पहाणे.
- आदर्श उपविधी तयार करणे.
- विधानसभा / विधानपरिषद प्रश्ना बाबत शासनास माहिती पुरविणे.
- उपसा जलसिंचन संस्थांबाबतच्या कर्जमाफी बाबतचा पत्रव्यवहार पहाणे.
· शासन योजना अंमलबजावणी करणे, रक्कम खर्च करणे, याबाबतचा पत्रव्यवहार पाहणे.
- उपसा जलसिंचन सहाकारी संस्थांना 25 टक्के अनुदान देणे बाबतचे प्रस्ताव छाननी करुन शासनास सादर करणे. व शासनाने मंजूर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे अनुदाना बाबतचे आदेश निर्गमीत करणे.
· शाखा व्यवस्थापन विषयक बाबी :-
- सर्व टेबल्सचे दप्तर 6 गठ्ठे पध्दतीने रचना करणे.
- ZPDD विवरणपत्रे संकलीत करुन सादर करणे.
- PR-A, PR-B नोंदवह्या अद्यावत ठेवणे.
- टेबल तपासणी घेणे.
- कर्मचा-यांच्या रजा मंजूर करणे व गोपनीय अहवल लिहीणे.
- KRA समितीचे संकलन व सादरीकरण करणे.
- महालेखापाल यांनी नोंदविलेले आक्षेप व परिच्छेदाचे निराकरण करणे.
- माहिती अधिकार अधिनियमान्वये प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज पहाणे