Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

दक्षता व तक्रार निवारण

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ.किशोर तोष्णिवाल 020-26129572
पदनाम अपर निबंधक (प्रशासन)  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव

श्री. राजेंद्र महाजन

020-26122846/7 Ext no.- 238, 239
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था  

कार्यासनाचे कामकाज

) सहकारी संस्थाबाबतच्या तक्रारी

 1. सहकार आयुक्त कार्यालयातील प्राप्त झालेल्या सर्व सहकारी संस्थांच्या तक्रारी (गृहनिर्माण सह.संस्थांच्या तक्रारी वगळून) या कार्यासनाकडे नोंदविल्या जातील व नंतर संबंधीत शाखेकडे पाठविल्या जातील.
 2. सर्व तक्रारींचा एकत्रित DATABASE तयार करणे.
 3. मुख्यालय पातळीवर प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेणे,चौकशी पुर्ण करुन घेण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणे.
 4. संबंधीत कार्यासनाकडे पाठविलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विभाग,जिल्हा,तालुका पातळीवर समन्वय साधणे.
 5. ज्या विभागात किंवा विशेषत: ज्या संस्थांच्या विरुध्द तक्रारी  प्राप्त झालेल्या आहेत त्याप्रकरणी अशा संस्थांची  विशेष सभा संबंधीत निबंधक व तक्रारदार यांचे उपस्थितीत बोलावणे व तक्रारींचे निवारण करणे बाबत मुख्यालयाच्या संबंधित कार्यासनाशी संपर्क साधणे.
 6. महाराष्ट्र शासनाने आपले सरकार या पोर्टलवर प्राप्त होणा-या तक्रारी, मा.मुख्यमंत्री,म.राज्य यांचेकडून प्राप्त होणा-या तक्रारी,तसेच सहकार आयुक्त कार्यालयाच्या संगणकीय प्रणालीमध्ये प्राप्त होणा-या तक्रारींचा प्राधान्याने व विहित मुदतीत निपटारा करणे. तसेच त्या बाबत संबंधित कार्यासनाशी समन्वय ठेवणे.
 7. प्राप्त तक्रारी अर्ज मुदतीत निकाली काढण्यासाठी कार्यवाही करणे
 8. ऑन लाईन तक्रार अर्जाबाबतची माहिती संकलित करणे.

a. मुख्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारी  ३ महिन्यात निकाली काढणे.

b. विभाग कार्यालयास प्रापत झालेल्या तक्रारी 2 महिन्यात निकाली काढणे.

c. जिल्हा व तालुका कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारी 1 महिन्यात निकाली काढणे.

) शासकिय अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुध्द तक्रारी

 1. अधिकारी/कर्मचारी तक्रार अर्जावर चौकशी करणे.
 2. चौकशी अहवाल शासनास सादर करणे.
 3. सेवानियमानुसार कायदेशिर कार्यवाही करणे बाबत आस्थापना शाखेस कळविणे.
 4. दोषी अधिकारी/ कर्मचारी विरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या अनुषंगाने कामकाम करणे.
 5. माहिती अधिकाराअंतर्गत तक्रारदारांना माहिती देणे.
 6. माहिती अधिकाराअंतर्गत अपिलीय कामकाज चालविणे.
 7. तक्रार निवारण सहकारी संस्था व दक्षता कार्यासनाचे सर्वसाधारण धोरणात्मक कामकाज.
 8. कार्यासनाचे आठवडा कार्यविवरण (Abstract) बाबतचे कामकाज.
 9. मा.मंत्री,मा.खासदार,मा.आमदार व अन्य लोकप्रतिनिधी आणि लोकआयुक्त यांचे तक्रारी बाबतचे कामकाज
 10. तक्रारी निवारण सहकारी संस्था व दक्षता कार्यासना मधील आवश्यकतेनुसार न्यायालयीन कामकाज.
 11. विधानसभा/विधानपरिषद/तारांकित/अतारांकित  कामकाज