Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

अंदाजपत्र‍क व नियोजन

कार्यासन प्रमुखाचे नाव डॉ. पांडुरंग खंडागळे 020-26128979
पदनाम अपर निबंधक, पतसंस्था  
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. दिलीप उढाण 020-26122846/7 Ext no.- 260, 262, 263
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था  

कार्यासनाचे कामकाज

धोरणात्मक बाबी

योजनेतर  व योजनंतर्गत (Non plan/ Plan) विषयक कामकाज

  1. चारमाही,आठमाही व वार्षिक अंदाजपत्रक, पुरवणी मागणी अंदाजपत्रक शासनास सादर करणे.
  2. अर्थसंकल्पीय वितरण  प्रणाली (BDS) वर तरतुदी वितरीत करणे.
  3. योजनांतर्गत योजनांचा (Plan) वार्षिक  व पंचवार्षिक नियोजन आराखडा शासनास सादर करणे.
  4. योजनेत्तर व  योजनांतर्गत योजनांचे वार्षिक खर्चाचे अहवाल शासनास सादर करणे.
  5.   सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक शासनास सादर करणे.
  6. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचे खाती शिल्लक रक्कमांबाबतचे  दरमहा अहवाल  शासनास सादर करणे.

अग्रीमे विषयक कामकाज

1.घरबांधणी,  मोटार सायकल अग्रीम व मोटार कार,  सायकल, वैयक्तीक संगणक अग्रीमे विषयक कामकाज.

ठेव संलग्न विमा योजना

1.खात्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या  वारसांना लाभ प्रदान करणे.

महसुली जमा विषयक कामकाज

1. चारमाही, आठमाही, वार्षिक अंदाजपत्रके  शासनास सादर करणे.

2. करेत्तर महसुला बाबतची माहिती शासनास सादर करणे.

3. महसुली जमा रक्कमांचे विभागीय स्तरावरील ताळमेळाचे कामकाज.

लोकलेखा समिती विषयक कामकाज

1.विनियोजन लेखे अहवालावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापनाबाबतची माहिती शासनास सादर करणे.

2.महसुली जमा अहवालावरील  स्पष्टीकरणात्मक ज्ञापनाबाबतची माहिती शासनास सादर करणे.

3.वाणिज्यीक लेखेबाबतची माहिती,  वित्तीय व्यवस्थापन लेखे बाबतची माहिती शासनास सादर करणे.

4. राज्य वित्त व्यवस्था अहवाल शासनास सादर करणे.

अन्वेषण प्रमाणपत्र विषयक कामकाज

1.थकीत कार्यालयीन भाडेपटी व कर ,दूरध्वनी ,वीज व पाणी याबाबत अन्वेषण  प्रमाणपत्र बाबतचे प्रस्ताव शासनास सादर करणे .

सहकारी संस्थामध्ये शासनाने केलेली गुंतवणुक व शासकीय वसुली

1. शासकीय  येणे वसुली संनियत्रण (भागभांडवल,लाभांश,कर्ज व्याज, हमीशुल्क व थकहमी शुल्क)

2. शासकीय भागभांडवल,कर्ज व्याज याबाबत निर्लेखन संबंधीचे कामकाज.

3.महालेखापाल यांना लेखापरिक्षणासाठी लागणारी माहिती (1 ते 11 नमुने )

 

खर्च ताळमेळ विषयक कामकाज

  1. महालेखापाल मुंबई/ महालेखापाल नागपूर/ अधिदान व लेखा कार्यालय, बांद्रा  यांचेकडील सर्व लेखाशिर्षांचे खर्चाबाबत ताळमेळाचे Online कामकाज  करणे.
  2. वॉर्निंग स्लीप संदर्भात संपूर्ण कामकाज.
  3. चुकीच्या नोंदींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शासनास सादर करणे.