GDC&A Examination: शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या मार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये राज्यात एकूण 16 केंद्रावर या परिक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परिक्षा केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत - जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, 1) मुंबई ब्रांदा (पूर्व)(3), 2) ठाणे 3)नाशिक 4)जळगाव, 5) अहमदनगर, 6) पुणे, 7) सोलापूर, 8) सातारा, 9) सांगली, 10) कोल्हापूर, 11) औरंगाबाद, 11) लातूर, 13) अकोला, 14) अमरावती, 15) नागपूर, 16) चंद्रपूर.
CHM Examination: सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी / कर्मचारी यांना पूर्णत: सहकारी गृहनिर्माण कायदा तसेच इतर अनुषंगिक कायदे (उदा. लेखापरीक्षण, व्यवस्थापन, हौसिंग नियम, मॅन्युअल, आदर्श उपनिधी इ.) ची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी “सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रमाणपत्र” (Certificate in Co-operative Housing Management) सुरु करण्यात आलेला आहे.
या परिक्षांची अधिसूचना प्रत्येक वर्षाच्या जानेवारी मध्ये प्रसिध्द करण्यात येते आणि संबंधीत केंद्रावर परिक्षा अर्ज स्विकारण्यात येतात. या संबंधी अधिक माहिती आपल्या जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अथवा तालुक्यांचे उप निबंधक, सहकारी संस्था / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात मिळू शकेल.
पात्रता विषयक अटी
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असला पाहीजे किंवा
- उमेदवार किमान एस.एस.सी. अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्याची सहकार खाते, कृषि उत्पन्न बाजार समिती अथवा कोणत्याही एका सहकारी संस्थेमध्ये, अर्ज करण्याच्या दिनांकास कनिष्ठ लिपीक अथवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पदावर, एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 5 वर्षे अथवा एच.एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर किमान 3 वर्षे सेवा पूर्ण झाली असली पाहीजे. तसेच तो सदर संस्थेत कार्यरत असून कायम होण्याची शक्यता असली पाहीजे. अर्ज करण्याच्या दिनांकास अर्जदार संस्थेमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे.
यापूर्वी जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेस बसलेल्या परंतु अनुत्तीर्ण झालेल्या व या परीक्षेस पुन्हा बसू इच्छिणा-या उमेदवारांसाठी नमूद करण्यात येते की, त्यांना पूर्वी परीक्षेस बसले असताना ज्या विषयात 50 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा विषयात त्यांना बदललेल्या अभ्यासक्रमानुसार व मंडळाच्या नियमानुसार सूट (एक्झमशन) मिळू शकेल, परंतु त्यासाठी पूर्वीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स (साक्षांकित) प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच अशी सूट मिळण्याची मागणी अर्जात स्पष्टपणे नमूद न केल्यास सदर विषयास या परीक्षेत अथवा त्यापुढील परीक्षेत सूट मिळणार नाही. सन 2001 व त्यापूर्वी जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना कोणतीही सूट मिळणार नाही.
अ.क्र
|
परीक्षा केंद्राचे नांव
|
सांकेतांक
(सेंटर कोड)
|
परीक्षा केंद्रप्रमुखाच्या कार्या लयाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक
|
1
|
मुंबई
|
o1
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई (3), कक्ष क्र. 69, तळमजला, गृहनिर्माण भवन, बांद्रा(पूर्व),मुंबई 51. दुरध्वनी क्र.022-26590997
|
2
|
ठाणे
|
o2
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे, वर्धावत मेन्शन, पहीला माळा,शिवाजीपथ, चेंदानी क्रॉसरोड, ठाणे (प),.दुरध्वनी क्र.022-25331486
|
3
|
नाशिक
|
o6
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, सहकार संकुल, सारडा सर्कल, मौलाना अबुल कलाम रोड, नॅशनल उर्दु हायस्कुल शेजारी, नाशिक दुरध्वनी क्र.0253-2591555
|
4
|
जळगांव
|
o8
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव,प्रशासकीय इमारत, 1ला माळा, 3 रा टप्पा, आकाशवाणी चौक, जळगांव .दुरध्वनी क्र.0257-2239729
|
5
|
अहमदनगर
|
o9
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अ.नगर, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक इमारत,स्टेशन रोड,अहमदनगर-414001 दुरध्वनी क्र.0241-2450055
|
6
|
पुणे
|
10
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (शहर) साखर संकुल, शिवाजीनगर, शेतकी महाविद्यालय आवार, पुणे-411005 दुरध्वनी क्र.020-25532335
|
7
|
सोलापूर
|
11
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर दुरध्वनी क्र.0217-2629749
|
8
|
सातारा
|
12
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा, नविन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, एस.टी.स्टॅण्डजवळ, सातारा 415 001 दुरध्वनी क्र.02162-234141
|
9
|
सांगली
|
13
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली, कुबेरा चेंबर्स, मारुती शोरुमच्या माडीवर, वखार भाग अमराईच्या मागे, सांगली 16 दुरध्वनी क्र.0233-2621313
|
10
|
कोल्हापूर
|
14
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, भुविकास बँक इमारत तिसरा मजला, पर्ल हॉटेलजवळ, स्टेशनरोड ,कोल्हापूर दुरध्वनी क्र.0231-2656258
|
11
|
औरंगाबाद
|
15
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद, शक्ती सहकार बिल्डींग, हॉटेल कार्तीकी समोर, औरंगाबाद दुरध्वनी क्र.0240-2331037
|
12
|
लातूर
|
21
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, शिवाजी चौक, लातूर दुरध्वनी क्र. 02382-245193
|
13
|
अकोला
|
23
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,अकोला, सहकार संकुल,आदर्श कॉलनी, अकोला दुरध्वनी क्र.0724-2452730
|
14
|
अमरावती
|
24
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती, कांतानगर, आयुक्त यांचे कार्यालयासमोर, अमरावती .दुरध्वनी क्र. 0721-2661633
|
15
|
नागपूर
|
27
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर, सहकार सदन,
हिंदुस्थान कॉलनी, अमरावती रोड, नागपूर. दुरध्वनी क्र. 0712-2551216
|
16
|
चंद्रपूर
|
29
|
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर, प्रशासकीय भवन, 2 रा मजला, बसस्थानकासमोर, चंद्रपूर.दुरध्वनी क्र.07172-250381
|
परीक्षा शुल्क - जी.डी.सी.ॲण्ड ए.परीक्षा शुल्क रु. 800/- (रुपये आठशे फक्त), तसेच सहकारी गृहनिर्माण प्रमाणपत्र परिक्षा शुल्क रु.500/- (रुपये पाचशे फक्त)राहील.
परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:-
दिनांक
|
विषय क्रमांक
|
विषय
|
वेळ
|
23/05/2015
|
1
|
मॅनेजमेंट ऑफ को.ऑप.हौसिंग सोसायटीज्
|
सकाळी 10.00 ते 1.00
|
23/05/2015
|
2
|
अकौंटस्
|
दुपारी 2 .00 ते 5.00
|
24/05/2015
|
3
|
ऑडिटिंग
|
सकाळी 10.00 ते 1.00
|
24/05/2015
|
4
|
हिस्ट्री, प्रिन्सिपल्स् ॲण्ड मॅनेजमेंट इन को.ऑपरेशन
|
दुपारी 2.00 ते 5.00
|
25/05/2015
|
5
|
को.ऑपरेटिव्ह लॉज् ॲण्ड अदर लॉज्
|
सकाळी 10.00 ते 1.00
|
25/05/2015
|
6
|
को.ऑपरेटिव्ह बॅकिंग ॲण्ड क्रेडिट सोसायटीज्
|
दुपारी 2.00 ते 5.00
|
जी. डी. सी. ॲण्ड ए. / सी. एच. एम. 2019 - निकाल
पर्यंतचा कालावधी निश्चि त करण्यात आला होता.
“दिनांक 22,23 व 24 मे,2020 रोजी घेण्यात येणारी जी.डी.सी. ॲन्ड ए व सी. एच . एम परिक्षा मे.2020 कोरोना (कोविड 19) महामारीमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत आहे”.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार – ब
जीडीसीए परीक्षा 2019 शुध्दीपत्रक
परिक्षार्थींना सूचना
जी. डी. सी. अँड ए. व सी. एच. एम. परीक्षा 2019 चा निकाल यापूर्वीच प्रसिद्ध केलेला आहे. या परिक्षेला बसलेल्या सर्व परिक्षार्थ्यांची गुणपत्रके व प्रमाणपत्रे परिक्षार्थ्यांना वितरित करणेसाठी संबंधित केंद्राचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे देण्यात आलेले आहेत.
परिक्षार्थींनी एका महिन्याचे कालावधीत त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र संबंधित केंद्रावरून स्वत: घेऊन जावे.
दिनांक 12/11/2020
सचिव,
जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्ड व तथा
उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण),
सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे- 1.
ज्या परिक्षार्थींना चलनाद्वारे परिक्षा शुल्क भरावयाचे आहे त्यांनी दि. 03-04-2018 पर्यंत
बँकेशी संपर्क साधावा.
Date of online submission of GDCA CHM Applications is extended up to 08-04-2018.
Date of online submission of Bank Challan in Bank Branch is extended up to 12-04-2018.
Date of online submission of GDCA CHM Applications is extended up to 13-04-2018.
Date of online submission of Bank Challan in Bank Branch is extended up to 19-04-2018.