Information not Available !!!
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040

नागरी सहकारी बँका

नागरी सहकारी बँका

  नागरी बँका

 

  शाखेबाबत माहिती

 

नागरी बँका कार्यासनामध्ये नागरी सहकारी बँकांचे बाबतीत सर्व प्रकारचे कामकाज चालते. याबाबत तालुका स्तरापर्यंत संघटनात्मक रचना आहे. नागरी बँकांबाबतची माहिती ही विहीत नमुन्यामध्ये संकलित करण्यात येते.

 

   नागरी बँक शाखेची  कामे

 

अ) बँकांचे पोटनियमामध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव बँक मंजूरीसाठी निबंधकांकडे पाठविते. निबंधक सदर प्रस्तावाची छाननी करतात आणि दोन महिन्यात बँकेस उत्तर / मंजूरीबाबत आदेश देतात.

ब) बँकेकडून प्राप्त झालेल्या जागा खरेदी / इमारत बांधकाम प्रस्तावावर कार्यवाही करणे.

क) संस्थेच्या संचालक किंवा सभासदांविरुध्द तक्रार प्राप्‍त झाल्यानंतर योग्य छाननीनंतर संस्थेच्या संचालक किंवा सभासदांना पदावरुन दूर करणे.

ड) नागरी सहकारी बँकांमध्ये अपहार, गैरव्यवहार, गंभीर अनियमीतता याबाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये चौकशी करण्यात येते.

इ) तसेच, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 नुसार बँकेच्या संचालक मंडळावर बँकेस झालेल्या नुकसानीची जबाबदारी संबंधीत व्यक्तींवर निश्चित करण्यात येते.

फ) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 98 अन्वये बँकेस झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित झालेल्या अपचारी व्यक्तींकडून वसुली करण्यासाठी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते.

ग) रिझर्व्ह बँकेकडून मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 110 (अे) (2) व कलम 102 अन्वये बँक अवसायनात घेणे.  

ह) रिझर्व्ह बँकेकडून मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 110 (अे) (3) अन्वये बँकेचे संचालक मंडळ निष्प्रभावित करणे व बँकेवर प्रशासक नियुक्ती करणे.   

ई) नागरी सहकारी बँकांच्या वसुलीसाठी बँकेच्या अधिका-यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 107 अन्वये वसुलीचे अधिकार प्रदान करण्यात येतात.

ज) नागरी सहकारी बँकांची  माहिती  ही विहीत नमुन्यामध्ये संकलित केली आहे.