Information not Available !!!

आमच्याविषयी

प्रस्तावना

सहकार आयुक्त व सहकारी संस्था नोंदणी निबंधक यांचा कृषी औद्योगिक क्षेत्रात मुख्यत्वे करून ग्रामीण पत पुरवठा यांचे क्षेत्रात प्रमुख भूमिका आहे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था म. रा. पुणे यांचे कार्यालयाचे कामकाज सहकार पणन व वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन व ग्रामीण अर्थपुरवठा आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्था, बँकिंग, जिल्हा मध्य. सह. बँक, औद्योगिक संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि नियम 1961 खाली चालते. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी म. रा. यांचेकडे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा 1963, मुंबई सावकारी कायदा 1546, मुंबई वखार कायदा 1959 आणि त्याखालील केलेले नियम ह्या कायद्याच्या खालील काम सोपविलेले आहे. सहकार म्हणजे लोकांची चळवळ ही उत्स्फुर्तपणे निर्माण झाली आहे. स्वयंनिर्मित व स्वयंपूर्ण काम आहे. तथापि चळवळीचे आर्थिक महत्त्व आणि लाभ यात समावेश असलेल्या अनेक लोकांचे हित विचारात घेऊन शासनाने यावर नियंत्रण व व्यवस्थापन राहणेसाठी कायदे केलेले आहेत. हे लोकांच्या हिताचे रक्षण करणेसाठी केलेले आहे. या कायदयाच्या कक्षेत खालील बाबींचा अंतर्भुत झालेला आहे.

  • सहकारी संस्था नोंदणी
  • सभासदांचे अधिकार
  • संस्थांच्या सवलती
  • संस्थांच्या मालमत्ता आणि निधि
  • संस्थांचे व्यवस्थापन
  • लेखापरिक्षण, चौकशी व तपासणी
  • वाद
  • संस्था अवसायनास घेणे.
  • गुन्हा आणि शिक्षा
  • अपिल, आढावा, पूनर्निरिक्षण

महाराष्ट्र हे भारतातील सहकार चळवळीतील विस्तारीत राज्य असून त्यास प्रदिर्घ इतिहास आहे. सहकार हे महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो. महाराष्ट्रात 2.18 लाख सहकारी संस्था आहेत. सहकार आयुक्त हे मित्र, तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक असल्याने त्यांना अनेक भूमिका कराव्या लागतात व संपूर्ण सहकारी चळवळीचे व्यवस्थापन करावे लागते.

उद्देश व जबाबदारी

 
अधिक उद्देश व जबाबदारी

विकसन व नियमन कार्य

 
अधिक विकसन व नियमन कार्य

अगोदरचे आयुक्त

अ.क्र. अधिका-यांचे नाव पासून पर्यंत
1 श्री. व्ही.सुब्रमणियम, भा.प्र.से.  01.06.1965 14.06.1968
2 श्री. आर.ए.झुबेरी, भा.प्र.से. 15.06.1968 07.01.1972
3 श्री. एम.एस.पळणीटकर, भा.प्र.से. 10.01.1972 15.09.1973
4 श्री. के.पद्मनाभय्या,  भा.प्र.से. 16.09.1973 18.02.1974
5 श्री. जे.जी.कांगा, भा.प्र.से.  19.02.1974 14.02.1977
6 श्री. एस.एच.ठक्कर,  भा.प्र.से.   14.02.1977 07.07.1978
7 श्री. एस.रामकृष्ण, भा.प्र.से.   07.07.1978 01.07.1981
8 श्री. एस.सुब्रमण्यम्, भा.प्र.से.  02.07.1981 01.07.1984
9 श्री. प्रभाकरन्, भा.प्र.से. 03.07.1984 20.10.1986
10 श्री. के.सी.श्रीवास्तव, भा.प्र.से. 20.10.1986 22.08.1990
11 श्री. व्ही.एस.गोपालकृष्णन, भा.प्र.से. 23.08.1990 02.06.1993
12 श्री. जगदीश जोशी, भा.प्र.से. 03.08.1993 24.02.1994
13 श्री. व्ही.एस.कोल्हटकर, भा.प्र.से. 24.02.1994 27.06.1995
14 श्री. आर.आर.कुलकर्णी, भा.प्र.से. 03.07.1995 09.07.1997
15 श्री.राजीव अग्रवाल, भा.प्र.से.(अतिरिक्त पदभार) 09.07.1997 04.08.1997
16 श्री. सुभाष एस.लाला, भा.प्र.से. 04.08.1997 19.05.2000
17 डॉ.सुधीरकुमार गोयल, भा.प्र.से. 19.05.2000 04.10.2001
18 श्री. रत्नाकर गायकवाड, भा.प्र.से.  04.10.2001 15.06.2003
19 श्री. उमेशचंद्र सरंगी, भा.प्र.से.  16.06.2003 09.01.2005
20 श्री. अपूर्व चंद्रा, भा.प्र.से.  09.01.2005 19.05.2005
21 डॉ.एस.के.शर्मा, भा.प्र.से.  19.05.2005 07.06.2006
22 श्री. अनिल डिग्गीकर, भा.प्र.से.   07.06.2006 22.05.2008
23 डॉ.कृष्णा लव्हेकर, भा.प्र.से.  22.05.2008 31.10.2009
24 श्री. राजेंद्र चव्हाण, भा.प्र.से.(अतिरिक्त पदभार) 31.10.2009 19.01.2010
25 श्री. राजगोपाल देवरा,भा.प्र.से.   19.01.2010 15.04.2011
26 श्री. दिनेश ल.ओऊळकर, (प्रभारी) 15.04.2011 09.05.2011
27 श्री. मधुकर चौधरी, भा.प्र.से. 09.05.2011 30.04.2014
28 श्री. दिनेश ल.ओऊळकर, (प्रभारी) 30.04.2014

06.01.2015

29 श्री. चंद्रकांत दळवी, भा.प्र.से. 06.01.2015 24.04.2017
30 डॉ.आनंद जोगदंड, (प्रभारी) 25.04.2017 07.05.2017
31 डॉ.जगदीश पाटील, भा.प्र.से. 08.05.2017 06.06.2017
32 श्री. चंद्रकांत दळवी, भा.प्र.से. 07.06.2017 23.07.2017
33 डॉ.विजय ना. झाडे, भा.प्र.से.  24.07.2017 20.09.2018
34 श्री. सतिश सोनी, (प्रभारी)  21.09.2018 21.01.2020
35 श्री. अनिल कवडे, भा.प्र.से.(अतिरिक्त पदभार) 22.01.2020 07.02.2024
36 श्री. सौरभ राव, भा.प्र.से. 07.02.2024 21.03.2024
37 श्री. अनिल कवडे, भा.प्र.से.(अतिरिक्त पदभार) 22.03.2024 31.03.2024
38 श्री. शैलेश कोतमिरे, (प्रभारी)  01.04.2024 27.05.2024